अपुऱ्या साधनांत काम करायचे की मरायचे | Sakal Media |

2021-04-28 339

कोल्हापूर - दिवसाला 55 घरे फिरायची, घराघरातील लोकांना ताप मोजायचा, आरोग्याची माहिती नोंद करायची,यावेळी थर्मल स्कॅनर कधी बंद पडते तर ऑक्‍सीमीटर आकडेच दाखवत नाही आणि "घरात कोणं नाही, उद्या या!' अशा पाणउताऱ्याचा सूर ऐकायचा, सर्व्हे करताना यंत्रणेने मास्क दिले नाहीत. हॅन्डग्लोग पदरचे वापरायचे, अशा अपुऱ्या साधनांवर शासकीय कर्मचाऱ्यांचे पथक दारोदार फिरत माहिती घेत आहे, "आम्ही काम करायचे की मरायचे' असाच सवाल या सर्व्हेक्षण पथकापुढे आहे. यात कॅन्सरग्रस्त शिक्षक, शस्त्रक्रिया झालेली आशा आहे,अशा अनेक अडथळ्यांचा सामना करत हे पथक सर्व्हेक्षणाचे काम करत आहेत. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या सर्व्हेक्षणाचा गडमुडशिंगी (ता.करवीर)येथील ग्राऊंड रिपोर्ट.

Videos similaires